वन पर्सन कंपनी चे फायदे आणि नुकसान (एक व्यक्ति कंपनी के लाभ और नुकसान ) Advantages and Disadvantages of One Person Company
Tax Datu offers valuable insights on tax, finance, and accounting. Get guidance on tax planning, compliance, and optimization. Learn about personal and business finance, budgeting, investments, and financial planning. Discover accounting principles, bookkeeping, and financial records management. Simplifying complex concepts, Tax Datu empowers you with knowledge to make informed decisions. Your go-to resource for tax-saving tips, financial strategies, and accounting best practices.
वन पर्सन कंपनी चे फायदे आणि नुकसान (एक व्यक्ति कंपनी के लाभ और नुकसान ) Advantages and Disadvantages of One Person Company
वन पर्सन कंपनी (One Person Company) देशाचे अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी मध्यम आणि मोठ्या उद्योग धंद्याचा हातभार जितका आवश्यक असतो तितकाच किंबहुना थोडा जास्तच म्हटलं तरी फारसे वावगे ठरणार नाही. लहान लहान उद्योजकांचा वाटा यामध्ये भरपूर असतो. लहान उद्योजकांच्या व्यवसायामध्ये उत्पादन निर्मिती असो किंवा मालाची खरेदी विक्री करण्याचा असो मालवाहतुकीचा असो किंवा अन्य प्रकारच्या सेवा असो तो त्याने उभारलेल्या त्याच्या उद्योगाचा पूर्णपणे मालक असतो. त्याच्याकडे जिद्द असते व स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी अपार कष्ट करण्याची त्याची तयारी असते त्या दृष्टीने वेळोवेळी निर्णय घेणे व ते अमलात आणणे हे गरजे असते. व अन्य उद्योग व्यवस्था मधल्या प्रकारांना खाजगी व सार्वजनिक कंपन्यांना किंवा भागीदारी फर्म त्यांना कठीण जाते. लहान उद्योजक वेळेप्रसंगी डोकं वापरून काम करून घेऊ शकतो व आपली जबादारी पार पडतो. याबाबतीत कोणावर अवलंबून नसतो लहान उद्योजकांकडे असलेले हे सर्व गुण लक्षात घेऊन त्यांच्या उद्योगाला कसे पाठबळ देता येईल त्याच्या आधारे देशाच्या अर्थव्यवस्थे वर चांगला परिणाम होईल असा विचार सरकारच्या सर्व स्तरांवर होत राहील.
या पार्श्वभूमीवर वन पर्सन कंपनी ही संकल्पना उदयास आली कंपनी कायदा 2013 मध्ये या संकल्पनेचे कायद्यात रूपांतर करून भारतामधील कुठल्याही नागरिकाला स्वतःची स्वतंत्र अशी कंपनी स्थापन करण्याची परवानगी दिली गेली. त्यामुळे उद्योग क्षेत्राच्या वाडी मधील हे एक अत्यंत असे महत्त्वाचे धोरण उघडले गेले. लहान उद्योजकांना या कायद्यामधील विशेष तरतुदीमुळे आर्थिक संरक्षण लिमिटेड लायबिलिटी कमी व्याज दरात बँकांकडून किंवा अन्य माध्यमातून कर्जाची उपलब्धता कंपनी स्थापन केल्यामुळे त्यांच्या उद्योगाचे चांगले व्यवस्थापन कामाच्या योजना इत्यादी यांचा परिणाम भविष्यकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भर पडेल व त्याचबरोबर कष्ट करणारे या लहान उद्योग वर्गाला समाजात एक मानाचे स्थान ही मिळू शकेल.
वन पर्सन कंपनी स्थापनेच्या प्रमुख व महत्त्वाच्या वैशिष्ट्ये :-
1-वन पर्सन कंपनी स्थापन करण्यासाठी कंपनीच्या कायद्याच्या संदर्भात खूप कमी पूर्तता करावी लागते या कंपनीसाठी फक्त एक भागीदार व एक संचालक चालू शकतो ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असू शकतात मात्र त्या व्यतिरिक्त एक नामनिर्देशक व्यक्ती नॉमिनी जरुरीचा असते.
2-वन पर्सन कंपनीला अधिकृत भाग भांडवल (Authorized Capital) हे किमान 100000/- रुपये असणे आवश्यक आहे मात्र व्यवसाय सुरू करताना हे सर्व भाग भांडवल त्याने पूर्णपणे व्यवसायत गुंतविण्याची गरज नाही.
3-लहान उद्योग धंदा सुरू करणारा उद्योजक याच्या उद्योगाचे व त्याचे व्यवस्थापनाची आखणी योग्य प्रकारे केलेली असतेच असे नाही परंतु तेच त्यांनी वन पर्सन कंपनी स्थापन केली तर आपोआपच त्याच्या उद्योगाला सुसूत्रता येते.
4-वन पर्सन कंपनीला प्रक्रियेच्या संबंधात असलेल्या सर्व सवलती ज्या प्रायव्हेट कंपनीला उपलब्ध असतात त्या सर्व या कंपन्या मिळू शकतात.
5-वन पर्सन कंपनी कंपनीच्या नावापुढे ओपीसी प्रायव्हेट हे शब्द असल्यामुळे अशा कंपन्या अन्य कंपनीतून वेगळी व उठून दिसते.
6-व्यावसायिक तंत्रज्ञान अवगत असणारा तंत्रज्ञान वन पर्सन कंपनी स्थापन करू शकतो.
7-वन पर्सन कंपनी चालवण्यासाठी व ती पुढे वाढवण्यासाटी जास्त जोखीम घेण्याची तयारी त्यांच्याकडे असते व ती तो त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारी मधून निभावू शकतो. एकच व्यक्ती वन पर्सन कंपनी चालवत असेल तरीसुद्धा कायद्यामध्ये ती व्यक्ती वन पर्सन कंपनी या भिन्न व वेगवेगळ्या (Separate legal Entity) ठरवल्या जातात.
8-वन पर्सन कंपनीची नोंदणी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून ओळखली जाते.
9-एखादी व्यक्ती दोन वन पर्सन कंपनी स्थापन करू शकत नाही त्याचप्रमाणे ती व्यक्ती दुसऱ्या वन पर्सन कंपनीमध्ये निर्देशित व्यक्ती नॉमिनी म्हणूनही राहू शकत नाही.
10-वन पर्सन कंपनीचे भाग भांडवल पन्नास ५०००००/- जास्त झाले ते (Paid Up Capital) वर्षी उलाढाल
(Turnover) मागील तीन वर्षांमध्ये सरासरी पद्धतीने दोन कोटी पेक्षा जास्त असेल तर ती कंपनी वर पर्सन कंपनी म्हणून राहू शकत नाही.
11-वन पर्सन कंपनी ही नॉन बँकिंग म्हणून व्यवसाय सुरू करू शकत नाही त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीमध्ये बॉडी कॉर्पोरेट गुंतवणूक करू शकत.
12-सध्या व्यवसायात करत असलेल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे भाग भांडवल 50 लाख पेक्षा कमी असेल किंवा त्या कंपनीची मागणी तीन वर्षाचे उलाढाल सरासरी पद्धतीने दोन कोटी पेक्षा कमी असेल तर अशी कंपनी वन पर्सन कंपनी म्हणून नोंदणी करू शकते मात्र त्यासाठी अशा कंपनीने एका विशेष ठरावाद्वारे (special Resolution )असा निर्णय घेतला पाहिजे. तसेच अशी कंपनी ही कायदा 2013 च्या कलम 8 च्या अंतर्गत नोंदली गेलेली नसावी
13-कंपनी कायदा 2013 कलम 8 अंतर्गत नोंदणी केलेल्या कंपन्या या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून नोंदवल्या जातात.
14-ठराविक काळानंतर कंपनीचा ऑडिटर बदलणे हे वन पर्सन कंपन्यांना लागू होत नाही थोडक्यात वन पर्सन कंपन्यांनी एकदा नेमणूक केलेले ऑडिटर बदलण्याची गरज नाही.
15-वन पर्सन कंपनी स्थापन केल्यामुळे त्या कंपनीची आर्थिक जबाबदारी मर्यादित राहते (Limited Liability) त्यामुळे त्या कंपनीच्या संचालक, मालक किंवा भागधारक त्यांच्यावर व्यक्तिशः कोणत्याही आर्थिक जबाबदारीचे ओझे पडत नाही. हा फायदा एखाद्या व्यक्तीने सुरू केलेला व्यवसाय कंपनी म्हणून चालू केला असेल तर त्याला मिळू शकतो. एखाद्या उद्योजकाने (Entrepreneur) स्वतःचा असं कोणताही उद्योग सुरू केला असेल व तो काही कारणाने उद्योग नुकसानित गेला तर उद्योगासाठी घेतलेला कर्ज फेडण्यासाठी त्याचे वैयक्तिक मालमत्ता (Personal Assets ) उपलब्ध करावी लागते.
वन पर्सन कंपनी के फायदे :-
1-व्यावसायिक तंत्रज्ञान अवगत असणारी एखादी व्यक्ती उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्ती, वन पर्सन कंपनी स्थापन करून आपल्याला आवडणारा व त्या उद्योगाचे बारकावे माहीत असलेला तंत्रज्ञान स्वतःच्या हिमतीवर उद्योग सुरू करू शकतो. त्याला त्यासाठी कोणतेही भागीदारी फॉर्ममध्ये भागीदार म्हणून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही खाजगी कंपनीत अगर सार्वजनिक कंपनीत कुठे नोकरी करण्याची गरज नाही.
2-प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला उपलब्ध असणाऱ्या सर्व सवलती वन पर्सन कंपनीलाही मिळतात या व्यतिरिक्त वन पर्सन कंपनीला विविध सूट मिळतात.
3-वन पर्सन कंपनी चालवण्यासाठी व ती वाढवण्यासाठी बरेच वेळा उद्योग क्षेत्रामध्ये येणारी जोखीम त्याला घ्यावी लागते अशी जोखींम घेण्याचा निर्णय त्याला त्वरित घेता येतो. अन्य कोणाशी बोलणे त्यांची संमती घेणे चर्चा करणे यात जाणारा वेळ यामध्ये वाचतो.
4-वन पर्सन कंपनी स्थापन केल्यामुळे त्या कंपनीची आर्थिक जबाबदारी मर्यादित राहते. त्यामुळे त्या कंपनीचा संचालक किंवा भागधारक यांच्यावर व्यक्तीच्या कोणत्याही आर्थिक जबाबदारीचे उभे पडत नाही वन पर्सन कंपनीचा उद्योग चालू असताना काही कारणांनी त्या कंपनीला व्यवसाय प्रचंड नुकसान झाले तर त्या कंपनीने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी संचालकांची किंवा भागधारकांचे वैयक्तिक मालमत्ता त्याला उपलब्ध करून द्यावे लागत नाही अशी वैयक्तिक मालमत्ता सुरक्षित राहते.
5-लहान उद्योग सुरू करणारा उद्योजक सर्वसाधारणपणे उद्योगाची व्यवस्थित आखणी केलेली असते असे नाही मात्र हेच जर त्याने वन पर्सन कंपनी स्थापन केली तर त्याला वेगवेगळ्या अनुभव मिळत जातात याचा उपयोग त्याला त्याच्या उद्योगांमध्ये सूत्रता आणण्यासाठी होतो यामध्ये पुढील काळाचे अंदाजपत्रक तयार करणे नफा-तोटा पत्र तयार करणे व अन्य आर्थिक पत्रके तयार करून त्याचा अभ्यास करून याचा उपयोग व्यवसाय कसा वाढवता येईल यासाठी त्याला दिशा मिळते.
6-वन पर्सन कंपनी स्थापन करण्याच्या बाबतीत कंपनी कायद्याच्या गरज खूप कमी आहेत अशा कंपन्यासाठी फक्त एक भागधारक व एक संचालक असला तरी चालतो त्याशिवाय ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे असली तरी चालतात मात्र अशा परिस्थितीत एक नामनिर्देशित व्यक्ती नॉमिनी असणे गरजेचे आहे.
7-वन पर्सन कंपनीमध्ये जर एकच संचालक असेल तर सर्व ठराव एकाच बोर्ड मीटिंगमध्ये मंजूर केली तरी चालतील अशा ठरावाच्या नोंदी कंपनीच्या मिनिट पुस्तकात नोंदवून त्या तारखेला बोर्ड मिटिंग झाली असे समजले जाईल यावर वन पर्सन कंपनीमध्ये एकापेक्षा जास्त संचालक असतील त्या कंपनीला दर सहामाहीमध्ये एक अशी संचालक मंडळाचे मीटिंग घेणे गरजेचे आहे संचालकाच्या दोन मीटिंगमध्ये किमान 90 दिवसांचा अंतरावर आवश्यक आहे.
8-आर्थिक पत्रकांवर फायनान्शिअल स्टेटमेंट फक्त एका संचालकाची सही असली तरीही पुरेसा आहे अशी पत्रके वर्ष संपल्यानंतर 180 दिवसांमध्ये रजिस्टरच्या ऑफिसमध्ये दाखल करावयाचे असते.
9-आर्थिक पत्रकांसोबत रोकड व्यवहारांची कॅश फ्लो माहिती जोडण्याची आवश्यकता नाही .
10-सभेची नोटीस देणे नोटीसी बरोबर अन्य माहिती देणे सभेसाठी किमान गणसंख्या चेयरमन निवड मताधिकार व त्यासंबंधी असलेली तरतुदी कंपनी कायदा 2013 कलम 100 ते 111 one Person Company la लागू होत नाही.
वन पर्सन कंपनी स्थापनेचे तोटे :-
1-वन पर्सन कंपनीचा सभासद हा किमान म्हणजे फक्त एकच असतो
2-वन पर्सन कंपनी ही फक्त लहान उद्योगांसाठी सोयीचे आहे उलाढालेल्या मर्यादा आहे परदेशी नागरिकांना वन पर्सन कंपनी स्थापन करता येत नाही
3-नॉन बँकिंग व्यवसाय या कंपनीला सुरू करता येत नाही त्याप्रमाणे Securities मध्ये गुंतवणूक करता येत नाही.
4-कंपनी कायदा 2013 चा कलम 8 प्रमाणे वन पर्सन कंपनी स्थापना करता येत नाही.
5-वन पर्सन कंपनी दीर्घकाळ चालू राहू शकत नाही कारण कंपनी चालविणार्याचा मृत्यू पावला तर अडचणी येऊ शकतात.
६-खाजगी कंपनी प्रायव्हेट यांच्या नफ्यावर जो आयकर भरावा लागतो तोच करवण पासून कंपनीला लागू होतो.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वन पर्सन कंपनी मध्ये रूपांतर
एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे भाग भांडवल 50 लाख पेक्षा कमी असेल किंवा ज्या कंपनीची मागील तीन वर्षाची आर्थिक सरासरी उलाढाल दोन कोटी पेक्षा कमी असेल तर अशा कंपनी वन पर्सन कंपनीमध्ये रूपांतर होऊ शकते.
अशा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कंपनीच्या सर्व सभासदांकडून व कंपनीच्या क्रेडिटर कडून कंपनीचे वन पर्सन कंपनीमध्ये रूपांतर करण्याला हरकत नसल्याची लेखी पत्र घेणे .
यानंतर कंपनीने भागधारकांची सभा बोलवून त्या सभेत कंपनीचे रूपांतर वन पर्सन कंपनीमध्ये कारणे या विषयी ठराव मांडून तो संमत करून घयावा.
त्याचप्रमाणे सर्वच secured creditors कडूनही अशा बदलला त्यांची संमती असल्याची लेखी पत्र घ्यावे सर्व संचालकांचे अशा बदलाला संमती असल्याचे प्रतिज्ञापत्र भागधारकांची यादी क्रेडिटर्सची यादी सर्व क्रेडिटचे हरकत नसल्याबद्दल पत्र विशेष ठरावाची प्रत नफा तोटा पत्र बॅलन्स शीट secured creditors ची संमती पत्र अशी सर्व कागदपत्रे कंपनी रजिस्टर कडे सादर करा.
रजिस्टर सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सादर कंपनी वन पर्सन कंपनी झाल्याचे सर्टिफिकेट देतो.
वन पर्सन कंपनीचे सार्वजनिक किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये रूपांतर
वन पर्सन कंपनीचे भाग भांडवल पन्नास लाखापेक्षा जास्त झाली किंवा मागील तीन वर्षाची सरासरी उलाढाल दोन कोटी पेक्षा जास्त झाली असेल तर वन पर्सन कंपनीला त्याच्या कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये किंवा सार्वजनिक कंपनीमध्ये रुपांतर करणे शक्य आहे
असे रूपांतर सहा महिन्याच्या कालावधीसाठी करणे जरुरीचे आहे.
प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये रूपांतर करावयाचे आपल्या सभासदांची संख्या किमान दोन व संचालक संख्या दोन असणे गरजेचे आहे.
सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर करावयाचे असेल तर सभासदांची संख्या किमान सात व संचालकांची संख्या किमान तीन असणे जरुरी आहे.
वन पर्सन कंपनीला याबाबतचा एक ठराव करून त्यांच्यावर आर्टिकल्स मध्ये योग्य असे बदल करावे लागतात.
वन पर्सन कंपनीने झालेल्या बदलाची संपूर्ण माहिती रजिस्टर ऑफ कंपनीजला कळविण्यात यावी .
वन पर्सन कंपनीच्या भाग भांडवलामध्ये मर्यादा पेक्षा वाढ झालेली असेल किंवा उलाढाली मध्ये मर्यादा पेक्षा तसेच जास्त उलाढाल झालेली असेल आणि त्यानंतरही कंपनीचे योग्य ठिकाणी रूपांतर केले नसेल तर संबंधित व्यक्ती दंडात पात्र ठरतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
The Gruha Lakshmi Scheme In Karnataka is a government initiative aimed at providing financial assistance to women who are the head of thei...
-
FAIR MARKET VALUE OF STOCKS ON 31/01/2018 FOR LONG TERM CAPITAL GIAN ON SHARES AND MUTUAL FUND TRADING_DATE ISIN_CODE ...
-
वन पर्सन कंपनी चे फायदे आणि नुकसान (एक व्यक्ति कंपनी के लाभ और नुकसान ) Advantages and Disadvantages of One Person Company वन पर्सन कंपनी ...
-
The Gruha Lakshmi Scheme In Karnataka is a government initiative aimed at providing financial assistance to women who are the head of thei...

No comments:
Post a Comment