डिजिटल रूपे म्हणजे काय व तो कसा वापरावा
१-डिजिटल रुपी म्हणजे काय ?
उत्तर -डिजिटल रुपी केंद्र सरकारद्वारे समर्थित चलन असून ते रेसेर्वे बँकेने जरी केलेयायला नियमित चलन सारखेच परंतु इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन आहै
२-केंद्राद्वारे समर्थित डिजिटल चलन म्हणजे काय ?
उत्तर-हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील चलन सेंट्रल बँक म्हणजे आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (R B I ) यांच्या कडून पारंपरिक चालना सारखेच जरी केलेले व रिझर्व्ह बँकेच्या विश्वास व पत प्राप्त असलेले चलन आहै .
३-ई रुपी चे इकॉनॉमी मध्ये संचालन कसे असेल ?
उत्तर- RBI ने सुरु केलेल्या ई रुपीचा उद्देश पारंपरिक कागदी चलनाला पर्याय उभा करण्याचा आहै. त्याचे संचालन किंवा उपयोग Digital Walt Q R कोडने Payment देण्या घेण्यासाठी करण्यात येईल . ज्यामुळे देण्या घेण्याचे व्यवहार सुरळीत होतील.
४-UPI व्यवहारातून यामध्ये वेगळं काय आहै ?
उत्तर-Upi व्यवहार मध्ये दोन बँकेतील Account Link असतात व अशी account व्यापारी बँकेकडून संचालित होत असतात मात्र ई रुपीचा उद्देश तुमच्या खिशातील बटव्यात असलेल्या रोकड चलनाला पर्याय उभा करण्याचा असतो व त्याला Reserv बँकेचे पूर्ण समर्थन असल्याने ई रुपी द्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रतिबिंब व्यापारी बँकेच्या खात्यात दिसणार नाही . त्याचे सर्व रेकॉर्ड स्वतः Reserve बँक ठेवेल .
५-ई रुपी मला कोणाकडून उपलब्ध होईल ?
उत्तर-सुरवातीला ई रुपी निवडक बँकांकडून विकत घेता येईल. मग त्या बँकेत तुमचे खाते असो अथवा नसो. हा व्यवहार बँक account मधून पैसे काढण्यासारखाच असेल विशिष्ट रक्कम भरल्यानंतर बँक तुमच्या ई रुपी Wallet मध्ये जमा करेल . त्याचा विनियोग तुम्ही पारंपरिक रुपयांप्रमाणे करू शकाल.
६-क्रिप्टो करेंसी होऊन हा व्यवहार कसा आहे ?
उत्तर -उत्तर क्रिप्टो करेंसी ब्लॉकचे टेक्नॉलॉजी वर आधारित असते ज्यामध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद होते व अशी नोंद कोणीही पाहू शकतो मात्र तीरुपी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी वर आधारित असली तरी त्याबाबतचे रेकॉर्ड सर्वांना पाहता येत नाही
७-ही रूपे मध्ये मी गुंतवणूक करू शकतो का ?
उत्तर हे रुपी गुंतवणूक साधन नाही जमा केल्यानंतर किंवा गुंतवल्यानंतर त्यावर व्याज मिळेल ती रुपी ही केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रोकड आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवहारात त्याचा वापर करता येईल
८- ई रुपी काढण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे ?
उत्तर -ई रुपी काढण्याचे उद्देश पुढील प्रमाणे
-रोखचलन छपाई व हाताळणे यावरील खर्चात कपात.
-रोकड रहित अर्थव्यवस्थेला चालना देणे.
-व्यवहार सुलभ व रोख व्यवहारांचा प्रवाह सुकर करणे.
-यूपीआय व्यवहारांचा खर्च कमी करणे.
-ई रुपी विविध कारणांमुळे CRYPTO CURREYNCY ला पर्याय ठरतो.
९-यामुळे देशभरातील लोकांना कोणती लाभ होतात ?
उत्तर -लाभ पुढीलप्रमाणे
- ई रुपीमुळे रोकड हाताळण्यातील जोखीम नियंत्रित होते.
-फाटक्या नोटांची चिंता पारंपारिक चलनात करावी लागते ई रुपीमध्ये अशी चिंता करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
-व्यवहार अत्यंत सुटसुटीत व कटकटी मुक्त होतात.
-जमा व पेमेंट यांच्या नोंदी ठेवणे सुलभ
१०-ई रुपी ला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल ?
उत्तर- त्याला पुढील आव्हानांना समोर जावे लागतील.
-प्रत्येक व्यवहाराची नोंदणी बँक ठेवत असल्याने व्यक्तिगत गोपनीयता उघड होते.
-ग्रामीण भागात आंतरजाल इंटरनेट उपलब्ध नसते त्यामुळे व्यवहार करणे अडचणीचे होईल.
-सायबर सिक्युरिटी चे प्रश्न वाढतील.
-केंद्रीभूत माहितीचा वापर अधिकारी अन्यथा करण्यासाठी करू शकतात .

No comments:
Post a Comment