विम्याचे प्रकार कोणते आहेत जाणून घेऊयात (Let us know what are the types of Insurance)

  


विमा ही आपली गरज आहे अनेकांना पटत पण ते विकत घेत नाही म्हणजे कृती होत नाही. याचं कारण काय असा विचार केला तर त्यांना प्राथमिक गोष्टी पटतात पण खोलवर माहिती नसते. मग बघूया, आता नको, परत फोन करा ,असंही अनेक ग्राहक मला सांगतात. इथे त्यांची अडचण असते की त्यांच्याकडे पैसे असतात गरजही असते आणि कळतही असते पण त्यांची तीव्र जाणीव होत नसते. त्यामुळे ते विमा घेण्याचे निर्णय पुढे ढकलत असतात. त्यांची अवस्था द्विदा होते अशावेळी विम्याची सखोल माहिती करून आवश्यक आहे.


1- जीवन विमा :



 

एखाद्या व्यक्तीवर कुटुंब व्यवसाय व इतर काही आर्थिक जबाबदाऱ्या असतात त्यात दैनंदिन प्रपंच मुलांची शिक्षण आजारपण यांचीही जबाबदारी असतात अशा जबाबदार व्यक्तीचा अपघात, आजार, आत्महत्या, या किंवा इतर कारणामुळे मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब निराधार होते.अशावेळी जीवन विमा संरक्षण रक्कम त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आर्थिक आधार देते.


2-आरोग्य विमा (मेडिक्लेम):



 मेडिक्लेम गतिमान जीवनशैली आहारातील बदल नोकरीच्या वेळांतील बदल यामुळे माणसाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे आजारपण आणि वैद्यकीय खर्च याचं प्रमाण वाढला आहे हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची वेळ पडली तर हे प्रकरण काही लाखात जातं त्यामुळे संभाव्य आजारपणातील खर्चाची तयारी म्हणून आरोग्य विमा (मेडिक्लेम) घेणे गरजेचे असते.


3-वैयक्तिक अपघात विमा:


अपघात विमा धारकाला तत्पुरता किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आले किंवा त्यांचा मृत्यू झाला तर या विमा अंतर्गत विमा कंपनी त्यांच्या नातेवाईक किंवा वारसाला त्यांनी काढलेल्या विमानुसार रक्कम देते.


4-गंभीर आजार विमा:


कर्करोगृह विकार अवयव निकामी होणे पॅरलेसिस स्मृतिभ्रंश यांसारख्या गंभीर आजारांचे उपचार खूप महागडे असतात या आजारांमध्ये दीर्घकालीन उपचारांची गरज असते त्यामुळे अधिक पैसा खर्च होतो त्यावेळी क्रिटिकल इलनेस अर्थात गंभीर आजार विमा उपयोगी पडतो.

5-व्यवसाय विमा :


व्यवसाय विमा हा व्यवसायातील सर्व घटकांची संबंधित आहे यामध्ये व्यवसायातील यंत्रे या सगळ्यांचा विमा काढता येतो आपत्तीच्या काळात होणाऱ्या मोठ्या नुकसानाची भरपाई या विम्याच्या रकमेतून होऊ शकते.


6-मरीन विमा:


मरीन विमा व्यवसायातील कच्चा किंवा पक्का माल  उत्पादन मशीन यांची वाहतूक करताना तो सुरक्षित पोहोचावा अशी इच्छा असते पण त्यांची वाहतूक करताना कोणतीही आपत्ती येऊ शकते त्या आपत्तीमुळे मोठा आर्थिक फटका बसू शकतो वाहतुकी दरम्यान सुरक्षितता मिळावी यासाठी हा विमा घेतात. 


7-वाहन विमा:


वाहनांचा कुठल्याही अपघातात झालेले नुकसान चोरी वाहनांना आग लागणे यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण वाहन विमा खरेदी करतो यात अपघातातील समोरच्या व्यक्तीचे नुकसान भरून देण्यासाठी थर्ड पार्टी विमा ही काढता येतो. 


8-सामूहिक कर्मचारी विमा:


 दुकान कंपनीतील कर्मचारी त्यांच्या घरून निघून कंपनीत काम करून परत घरी येईपर्यंत जबाबदारी कंपनीच्या मालकाची असेल त्यासाठी मालक कंपनी यांच्या सामूहिक कर्मचारी विमा काढू शकतात. 


9-रहिवासी मालमत्ता विमा:


 घर लॉज रेस्टॉरंट या मालमत्ता बरोबर इतर रहिवासी मालमत्तांच्या सुरक्षिततेसाठी रहिवासी मालमत्ता विमा काढला जातो. 


10-ट्रॅव्हल विमा:


 देशांतर्गत, परदेशी प्रवासात चोरी, वैद्यकीय अपघाती खर्च, उद्भवले असते तर तारांबळ उडते मुख्य म्हणजे आपण आपल्या घरापासून लांब असल्याने आर्थिक मदत मिळवून अवघड होतं अशावेळी ट्रॅव्हल इन्शुरन्स उपयोगी पडतो. 


11-पशू विमा:


 शेतकऱ्यांच्या जमिनी प्रमाणेच यांचे पशु हे त्यांचा सगळ्यात मोठा धन असतं एखादा आजार किंवा नेसर्गिक आपत्ती, अपघातात पशुचा मृत्यू , झाला किंवा उपचारांसाठी खर्च करावा लागतो तर त्या विमा उपयोग होतो. 


12-जनरल लायबिलिटी विमा : 


विमा आपल्या उत्पादनाच्या दर्जाचे कायदेशीर जबाबदारी घेणे गरजेचे असते उत्पादक ती घेतात पण काही कारणांनी उत्पादनाच्या दर्जा तफावत  जाणवली तर मोठ्या प्रमणात  नुकसान होऊ शकतो दर्जातील दोष दूर करण्यासाठी आवश्यक खर्चासाठी जनरल लायबिलिटी विम्यातून  मिळणाऱ्या रक्कम उपयोगी पडते. 


 13-टर्म इन्शुरन्स:


 टर्म इन्शुरन्स हे एकच माध्यम आहे जे आपल्या सर्व आर्थिक  जबाबदार पूर्ण  करू शकतात घरातील करती व्यक्ती आपल्या नोकरीच्या काळात कुटुंबाच्या आर्थिक गरज भागवत असते घरातल्या सर्वांच्या आर्थिक गरज लक्ष्यात घेतल्या तर अशा व्यक्तीचे जीवन मूल्य हे दीड ते दोन कोटीच्या घरात जात आणि मिळकत कमी असो किंवा जास्त इतक्या रकमेची शाश्वती देणारा एकमेव उपलब्ध पर्याय म्हणजे टर्म इन्शुरन्स .  कमी हप्त्यात मोठा फायदा इथे मिळत असतो त्यामुळे हा इन्शुरन्स  महत्वाचा आहे आणि जेवढ्या कमी वयात तुम्ही हा इन्शुरन्स कराल तेवढे तुम्हाला प्रीमियम कमी लागतील आणि हा प्रीमियम नॉन REFUNDABLE आहे



सध्या भारतीय विमा बाजारपेठेत अंदाजे प्रमुख 30 कंपन्या आहेत त्यांनी ग्राहकाच्या आयुष्याचा विचार करून विविध प्रोडक्ट काढली आहेत त्यामुळे आपल्या गरजेनुसार प्रॉडक्ट निवडणे ग्राहकांच्या सहारासार विचाराव नमून असतं विम्याचे अनेक प्रकारही आहेत पण त्यातील काही प्रमुख प्रकार मी येथे प्राथमिक स्वरूपात सांगितले आहे 

No comments:

Post a Comment

 The Gruha Lakshmi Scheme  In Karnataka is a government initiative aimed at providing financial assistance to women who are the head of thei...